Saturday, September 12, 2009

जिजाऊ वंदना

जिजाऊ वंदना

जिजाऊ वंदनाजिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हालातुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

(ही वंदना सरवान्नी नित्य म्हणावी , या मूल तुमच्या मधे शिव तेज जागे होईल l,या वन्दनेच्या नित्य पाठनाने सर्व प्रकारचे ब्रह्मसंकते नाहीशी होतात ,व आपल्याला सत्याच्या जवळ जान्यासाठी मदत होते , या वंदनेत मोठे आध्यात्मिक शक्ति आहे .............................जय जिजाऊ माउली ..तुच भवानी माउली...सदैव तुज्या लेकरानवरती राहों तुजी साउली...)

No comments:

Post a Comment